Breaking

गुरुवार, मे २६, २०२२

खेड्यातील शेतकऱ्याने पिकवला जगातील सर्वात महागडा आंबा !

 



नवी दिल्ली : जगातील सर्वात महाग असलेल्या आंब्याच्या प्रजातीचे झाड खेड्यातील एका शेतकऱ्याने मोठे केले असून या झाडाचे आंबे अडीच ते तीन लाख रुपये किलो दराने विकले जातात. 


भारतात विविध  प्रजातींचे आंबे पिकवले जातात पण त्यांना कुठल्या वर्षी किती दर मिळेल याची शाश्वती तर नसतेच पण निसर्गाने झटका दिला तर सगळेच मुसळ केरात जात असते. भारतीय शेतकरी सतत अधिक उत्पन्न घेण्यासाठी नवनवे प्रयोग विविध पिकांवर आणि फळांवर करीत असतो. तरीही भारतीय प्रजातींच्या आंब्यांना काही ठराविक दर मिळत असतो तर काही प्रजातीचे आंबे अत्यंत स्वस्तात देखील विकले जातात. अपेक्षित बाजारमुल्य मिळत नसल्याने शेतकरी वर्षभर कष्ट करूनही आर्थिक अडचणीत जगत असतो. ओरिसाच्या बारगढ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

 
बाजारात लाखो रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या आंब्याच्या प्रजातीचे झाड एका खेड्यातील शेतकऱ्याने जोपासले, वाढवले आणि त्याला प्रचंड किंम्मत देणारे आंबेही लागले आहेत. निलाथर गावातील चंदू सत्यनारायण यांनी 'मियाझाकी' जातीचा आंबा सेंद्रिय पद्धतीने वाढवला आणि त्यांना यश देखील आले आहे. हा आंबा बाजारात अडीच ते तीन लाख रुपये किलो दराने विकला जातो. खेड्यात जन्मलेल्या आणि प्राथमिक शिक्षण देखील पूर्ण न केलेल्या चंदू सत्यनारायण यांच्या आंब्याला पाहण्यासाठी देखील शेतकरी गर्दी करू लागले आहेत. (Farmers grow the world's most expensive mango) सद्या पन्नास वर्षांचे वय असलेल्या या चंदू सत्यनारायण यांनी बांगला देशातून या प्रजातीच्या आंब्याचे कोय आणली आणि आपल्या शेतात लावून त्याची जोपासना करून ते वाढवले आहे. त्याला आता महागडे आंबे  लागले आहेत. 


कुतूहलाचा विषय !
चंदू सत्यनारायण यांनी जोपासलेल्या आंब्याच्या या झाडाला लागलेले दोन आंबे हा मोठ्या कुतूहलाचा विषय बनला आहे. या आंब्याचा रंग देखील भारतीय आंब्यापेक्षा वेगळा असून त्याला मिळणारी किंमत देखील लाखो रुपये किलोंची आहे त्यामुळे उत्सुकतेने आणि मोठ्या कुतूहलाने शेतकरी या झाडाभोवती जमा होत आहेत. 


सरकारकडे मागणी !
बांगला देशातून कोय आणलेल्या या आंब्यास आता दोन आंबे लागले असून ते बाजारात खपविण्याची मागणी चंदू सत्यनारायण यांनी सरकारकडे केली आहे. राज्याचे कृषी सहाय्यक संचालक वासुदेव प्रधान यांनी चंदूच्या कौशल्याचे कौतुक करून एवढा महाग आंबा पिकवणारा शेतकरी राज्यात नसल्याचे म्हटले आहे. या आंब्याच्या मार्केटिंगसाठी सरकार पावले उचलणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 


हे देखील वाचा :>>>>

खालील बातमीला टच करा !



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !    


   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा