Breaking

बुधवार, मे २५, २०२२

खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी !

 


नवी दिल्ली : हनुमान चालीसा प्रकरणी चर्चेत आलेल्या अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ उडाली आहे. 


गेल्या काही दिवसात खासदार नवनीत राणा हे नाव बहुचर्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासाच्या बाहेर हनुमान चालीसा वाचणार असल्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला त्यामुळे शिवसैनिक देखील आक्रमक झाले आणि मुंबईत पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला. याप्रसंगात मुंबई पोलिसांनी राणा पती पत्नींना अटक केली होती आणि काही दिवसानंतर त्यांना जामीन मिळाला होता. संबंधित गुन्ह्याच्या संदर्भात माध्यमांशी काही न बोलण्याच्या अटीवर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता परंतु या अटीचा त्यांनी भंग केला म्हणून त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. त्याची सुनावणी सुरु आहे. 


अपक्ष असणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे वातावरण बिघडलेले होते आणि शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. राज्यातून देखील या घटनेवर पडसाद उमटले होते आणि हनुमान चालीसा वाचायची तर आपल्या घरी किंवा मंदिरात वाचावी अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांवर देखील उमटल्या होत्या. भारतीय जनता पक्षाने मात्र राणा दाम्पत्यांना पाठबळ दिल्याचे दिसत आहे. 'मातोश्री' च्या दारात हनुमान चालीसा वाचण्याच्या विषयावरून वादग्रस्त ठरलेल्या खासदार नवनीत राणा यांना आता ठार मारण्याची धमकी (MP Navneet Rana threatened to kill) देणारा फोन आला असल्याबाबत नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  


तुमची हत्या करू !

'हनुमान चालीसा म्हटल्यावर तुम्हाला जीवे मारण्यात येईल. तुम्हाला महाराष्ट्रात घुसून देणार नाही, पुन्हासार्वजनिक ठिकाणी जर हनुमान चालीसा वाचली तर तुमची हत्या करण्यात येईल' अशी धमकी खा. नवनीत राणा याना फोनवरून देण्यात आल्याची तक्रार राणा यांनी पोलिसात दिली आहे. 


राणा याना सुरक्षा !

खा. नवनीत राणा याना अलीकडेच केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरविली आहे. शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यातील संघर्ष वाढल्यामुळे केंद्र शासनाने खा. राणा याना ही सुरक्षा दिली आहे. हनुमान चालीसा सार्वजनिक ठिकाणी वाचण्याच्या मुद्द्यावर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.   


खालील बातमीला टच करा !


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा