Breaking

बुधवार, मे २५, २०२२

माणसं जोडणाऱ्या "मोठ्या माणसाला" श्रद्धांजली !

 




पंढरपूर : ज्यांनी आयुष्यभर माणसं जोडून संतत्वाचे जीवन व्यतीत केले त्या  राजाराम नाईकनवरे या मनाने प्रचंड श्रीमंत असलेल्या व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली अर्पण करून विविध क्षेतातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणीला पुन्हा एकदा उजाळा दिला.

 
सामान्यपण जपणारी पण असामान्य असणारी काही मोजकी व्यक्तिमत्वे समाजात असतात, असे मोठ्या मन लाभलेले आणि कुणाच्याही हाकेला प्रतिसाद देत धावून जाणारे संतपेठेतील राजाराम महादेव नाईकनवरे यांचे गतवर्षी कोरोनाच्या आक्रमणामुळे निधन झाले आणि प्रचंड हळहळ व्यक्त होत राहिली. या अत्यंत दु:खद  प्रसंगी पंढरपूर परिसरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबियांना भेट देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला. राजाराम नाईकनवरे यांची सैन्यदलात असलेले चिरंजीव विक्रम नाईकनवरे आणि कुटुंबियांचे अनेकांनी सांत्वन केले होते. यात विधान परिषदेचे तत्कालीन आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे यांचाही समावेश होता. माणसं कमाविलेल्या या मोठ्या मनाच्या माणसासाठी अनेकांचे डोळे ओले झाले होते. (Tribute to Rajaram Naikanavare) संत पेठेतील भाई भाई चौक तर निशब्द झाला होता. 


स्वर्गीय राजाराम नाईकनवरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने पुन्हा त्यांच्या आठवणी अनेकांच्या डोळ्यासमोर ताज्या झाल्या आणि त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, आमदार समाधान आवताडे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, पत्रकार आदींनी राजाराम नाईकनवरे यांना अभिवादन करून त्यांच्या आठवणीला उजाळा दिला. यावेळी त्यांचे चिरंजीव विक्रम नाईकनवरे, दीपक नाईकनवरे आणि कुटुंबीय, नातेवाईक उपस्थित होते. समाजात वावरताना त्यांनी कमावलेली माणसं हीच त्यांची खरी संपत्ती असल्याचा प्रत्यय पुन्हा या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने दिसून आला.


माणसातला 'माणूस' !


कै. राजाराम नाईकनवरे हे 'माणसातला माणूस' होते, विद्युत विभागात सेवा करून ते सेवानिवृत्त झाले होते आणि एखाद्या संताप्रमाणे आपले आयुष जगत होते. वागण्यातला साधेपणा, आपुलकीचा स्वभाव आणि हाक मारेल त्याच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे त्यांनी हजारो माणसं जोडली होती. विद्युत विभागात सेवेत असतानाही त्यांनी कामगार संघटना अध्यक्ष, पतसंस्था चेअरमन अशी पदे सांभाळली होती. माणूस जोडण्याचे त्यांचे व्यसनच होते. ते बोलू लागले की ऐकणारे ऐकतच रहात होते आणि  एक एक माणूस कधी त्यांच्याशी जोडला जात होता हे समजत देखील नव्हते.        


हे जरूर वाचा : >>>>

खालील बातमीवर टच करा !


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा