Breaking

रविवार, मे २२, २०२२

बालकाच्या शरीरात इंजेक्शनची सुई, परिचारिकेचा निष्काळजीपणा !

 


जालना : अवघ्या पाच वर्षे वयाच्या बालिकेच्या शरीरात इंजेक्शनची सुई आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली असून एका नर्सच्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर प्रकार घडला आहे. 


रुग्णालयातील बेपर्वाई अनेकदा रुग्णाच्या जीवावर बेतली जाते. शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून काही वेळा शस्त्रक्रियेचे साहित्य पोटात राहून जाते आणि रुग्णाच्या प्राणाला धोका निर्माण होतो. कापसाचे बोळे, हातमोजे एवढेच काय कात्री देखील महिलेच्या पोटात राहिल्याची उदाहरणे घडली आहेत. काही दिवसांच्या त्रासानंतर असे प्रकार उघडकीस येतात आणि या वस्तू बाहेर काढण्यासाठी पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागते. डॉक्टर अथवा नर्सच्या थोड्याशा निष्काळजीपणाचा मोठा फटका रुग्णाला बसत असतो. जालना येथील एका रुग्णालयात तर अवघ्या पाच वर्षे वयाच्या बालकाबाबत असा प्रकार घडल्याचे समोर आले आहे आणि यामुळे मोठी खळबळ देखील उडाली आहे. 


जाफराबाद तालुक्यातील आरदखेडा येथील सुमित्रा जाधव या जालना येथील महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या होत्या. यावेळी त्यांनी एका मुलीला जन्म दिला. नुकत्याच जन्मलेल्या बालिकेचे वजन खूप कमी असल्यामुळे तिला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले होते. या विभागात चार पाच दिवस या बालिकेवर उपचार सुरु होते परंतु नवजात बालिका सतत रडत होती. काही केल्या मुलीचे रडणे थांबत नव्हते आणि तिच्या रडण्याचे कारण देखील लक्षात येत नव्हते. अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या बालिकेला दुसऱ्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


शरीरात सुई !

दुसऱ्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे सोनोग्राफी करण्यात आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. बालिकेच्या शरीरात इंजेक्शनची सुई असल्याने या सोनोग्राफीत दिसून आले. (Injection needle into newborn baby's body)या बालिकेच्या पाठीत इंजेक्शनची सुई असल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. 


नर्सचा निष्काळजीपणा 

नवजात बालिकेवर उपचार करताना नर्सच्या निष्काळजीपणामुळे हे घडले असून इंजेक्शनची सुई तशीच राहिल्याने बाळाची प्रकृती बिघडली असल्याचा आरोप नातेवाईकानी केला आहे. या बालिकेला पुन्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित नर्सच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी नातेवाईक करू लागले आहेत.  



हे जरूर वाचा : >>> 

खालील बातमीला टच करा !


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !       


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा