Breaking

रविवार, मे २२, २०२२

महाराष्ट्र राज्य सरकारनेही केले पेट्रोल डिझेलचे दर कमी !

 

 



मुंबई : केंद्र सरकार पाठोपाठ महाविकास आघाडी सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील करात कपात केली असून आता इंधनाचे दर आणखी कमी झाले आहेत. महागाईच्या आगीत सामान्य जनतेसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.   


केंद्र शासनाने कालच पेट्रोलच्या दरात ९ रुपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त करण्याचा घेतला आहे. सद्याच्या महागाईच्या काळात हा मोठा दिलासा लाभला असून  लिटरमागे पेट्रोल ९.५० रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने करात कपात केल्याने हा मोठा दिलासा मिळणार आहे. इंधनावर लादलेल्या वेगवेगळ्या करामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत. या करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ही दिलासादायक घोषणा केली आहे. (Maharashtra government reduced fuel prices)  या घोषणेमुळे महसुलात वर्षाला सुमारे १ लाख कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. केंद्र शासनाच्या पाठोपाठ राज्य सरकारने देखील इंधनावरील कर कमी करण्याचा निर्णय आज घेतला.


राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज इंधनावरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला असून पेट्रोल २ रुपये ८ पैसे तर डिझेल १ रुपया ४४ पैशांनी दर कमी केले जाणार आहेत. आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) ही कपात केली जाणार आहे त्यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे. 


महसुली उत्पन्नात घट 
शासनाने मूल्यवर्धित कर कमी केल्यामुळे पेट्रोलसाठी महिन्याला ८० कोटी आणि डिझेलसाठी १२५ कोटी एवढ्या महसुली उत्पन्नात घट होणार आहे. केंद्र सरकार पेट्रोलवर ७ रुपये ६९ पैसे आणि डिझेलवर १५ रुपये १४ पैसे प्रतिलिटर कर आकारीत होते. केंद्र शासनाने मे २०२० मध्ये पेट्रोलच्या अबकारी करात १३ रुपये आणि डिझेलच्या अबकारी करात १६ रुपये वाढ केली होती.  

राज्य शासनावरही दबाव !
केंद्राने काल इंधनावरील करात मोठी कपात केल्याने राज्य शासनावर देखील कर कपातीबाबत दबाव वाढला होता. केंद्राने कर कपात केल्यामुळे राज्य शासनानेही कर कमी करण्याची मागणी वाढू लागली होती परंतु ठाकरे सरकारने अत्यंत जलद गतीने हा निर्णय घेतला त्यामुळे आता पेट्रोल साडे अकरा रुपयांनी तर डिझेल आडे आठ रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा