Breaking

गुरुवार, जून ०२, २०२२

पंढरपूर आषाढी वारीसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त !

 



पंढरपूर : पंढरीतील चार यात्रापैकी प्रमुख असणाऱ्या आषाढी वारीसाठी प्रशासनाच्या हालचालींना वेग आला असून खास आषाढीसाठी स्वतंत्र अप्पर जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


पंढरीच्या चार यात्रांपैकी सर्वात मोठी आषाढी यात्रा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आषाढी यात्रेसाठी राज्याच्या कोनाकोपऱ्यातून भाविक पंढरीत येत असतातच पण राज्याच्या बाहेरून आणि परदेशातून देखील काही भावी पंढरीत येत असतात. भाविक आणि वारकरी यांच्यासाठी पंढरीची आषाढी यात्रा अत्यंत महत्वाची असते आणि पडत्या पावसात देखील भाविक पंढरीत दाखल होत असतात. कोरोनाच्या फटक्यामुळे गेल्या दोन वर्षांत आषाढी यात्रा भरू शकली नाही त्यामुळे अनेक भाविकांचा हिरमोड झाला होता. कोरोनाच्या काळानंतर निर्बंध हटल्यानंतर आता आषाढी यात्रा भरत आहे त्यामुळे यावेळी आषाढीसाठी विक्रमी गर्दी होणार हे स्पष्ट आहे. भाविकांच्या संख्या मोठी असल्यामुळे प्रशासनावर आषाढी यात्रेत नेहमीच  ताण पडत असतो परंतु यावेळी हा ताण अधिक वाढण्याची शक्यता आहे. 


आषाढी यात्रा सुरळीत पार पडावी आणि यात्रेवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांची इंसीडन्ट कमांडर म्हणून नेमणूक केली आहे. आषाढी यात्रेवर विविध शासकीय विभागांचे योगदान असतेच परंतु अनेक शासकीय अधिकारी पंढरीत थांबून यात्रेचे नियोजन करीत असतात. यावेळी तर एका स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. (Special Officer for Pandharpur Ashadi Yatra)  आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख मुणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही नियुक्ती केली आहे. 


सर्वस्वी जबाबदारी !
पालख्यांच्या प्रस्थानापासून मुक्कामापर्यंत आणि त्यांना नेमून दिलेल्या पालखी तळापासून पालख्यांचे प्रस्थान होईपर्यंतच्या कालावधीपर्यंतची जबाबदारी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सर्व शासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा यांच्याशी संवाद ठेवून इंसीडन्ट कमांडर यांनी यात्रा सुरळीत होण्यासाठी सर्व बाबी हाताळाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. 


विक्रमी गर्दीची शक्यता
दोन वर्षात पहिल्यांदाच आषाढी सोहळा साजरा होत असून यंदा वारीसाठी भाविकांची मोठी आणि विक्रमी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यात यावर्षी पावसाळा चांगला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी आषाढी वारीसाठी विक्रमी गर्दी होण्याचे संकेत मिळत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा