Breaking

मंगळवार, जुलै १२, २०२२

सोलापूर जिल्हा भाजप अध्यक्ष श्रीकांत देशमुख अडचणीत !

 



सोलापूर : समाज माध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल होताच भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे भलतेच अडचणीत आले असून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे. 


सोशल मीडियावर एका महिलेसोबत एका खोलीत असलेला श्रीकांत देशमुख यांचा एक व्हीडीओ अत्यंत वेगाने व्हायरल झाला आणि त्या पाठोपाठ एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल होत आहे. अत्यंत खळबळजनक प्रकार असल्यामुळे ज्यांना ही क्लिप प्राप्त होत आहे तो ती इतरांना पाठवत आहे. या व्हिडीओत एका खोलीत एक महिला आणि देशमुख हे दिसत आहेत. सदर व्हिडीओ या खोलीतील महिलेनेच चित्रित केला आहे. बेडवर बसलेल्या श्रीकांत देशमुख यांच्याकडे बोट दाखवत ही महिला आपली फसवणूक केल्याचे सांगत आहे. यानंतर देशमुख हे बेडवरुन उठत महिलेकडे गेल्याचे दिसत असून मोबाईल हिसकावून घेतल्याचा आवाज येत आहे.  हा कथित व्हिडीओ वायुवेगाने समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून या घटनेची दाखल घेण्यात आलाय आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याची दखल घेत देशमुख याना पदावरून मुक्त केल्याचे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.    


व्हिडीओ पाठोपाठ अत्यंत खळबळजनक अशी एक ऑडिओ समाज माध्यमावर फिरत आहे. या संवादातून बऱ्याच बाबी उघडकीस येत आहेत. आपसातील वादाचे कारण या संवादातून स्पष्ट होत आहे त्यामुळे ही ऑडिओ क्लिप ऐकली जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षावर हे आरोप झाले असून त्यांना तातडीने पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. सदर व्हिडीओ अथवा ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत 'शोध मराठी न्यूज' कसलाही दावा करीत नाही परंतु देशमुख यांच्या नावाने ही क्लिप व्हायरल होत आहे. सदर प्रकरणाबाबत देशमुख यांचा खुलासा अद्याप प्राप्त झाला नाही.     


सदर वादात सापडलेले श्रीकांत देशमुख हे सांगोला येथील असून गेल्या काही काळापासून राजकीय पटलावर सांगोला भलताच प्रसिद्धीला येताना दिसत आहे. हॉटेलच्या बिलावरून आमदार सदाभाऊ खोत याना रोखल्याचे प्रकरण भलतेच वादग्रस्त ठरले होते, त्यानंतर 'काय झाडी, काय डोंगार, काह हाटील ... ओक्के' हा सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा संवाद राज्यभर आणि राज्याच्या बाहेर देखील गाजला आणि त्याला वारेमाप प्रसिद्धीही मिळाली . त्यापाठोपाठ आता सांगोला येथीलच भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नावाने कथित व्हिडीओ व्हायरल होत असून त्याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (Solapur district BJP president Shrikant Deshmukh in trouble)  



  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा