Breaking

रविवार, मे १५, २०२२

अपघात ! जीपला जोराची धडक देत ऑक्सीजन टँकर उलटला !

 




मोहोळ : मोहोळ शिवारात आज पुन्हा एक अपघात झाला असून बोलेरो जीपला पाठीमागून धडक देत ऑक्सीजनचा टँकर रस्त्यावरच आडवा झाला परंतु टँकर चालकाच्या कौशल्याने मोठी जीवितहानी मात्र टळली गेली आहे. 


सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळच्या परिसरात अपघाताचे प्रमाण भलतेच वाढल्याने चिंता व्यक्त होत असतानाच सतत एकेक अपघात होताना दिसत आहेत. आजवर मोहोळ शिवारात अनेक अपघात झाले असून यात प्रवाशांचे प्राण जात आहेत. मोहोळ परिसरातच अधिक प्रमाणात अपघात होत असल्याने याचे कारण देखील शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. सतत या परिसरात अपघात होत असल्याने मोहोळ परिसरातून गेल्या काही दिवसांपासून चिंता व्यक्त होत असतानाच आज पुन्हा एक अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी मोठी जीवितहानी मात्र टळली गेली आहे. ऑक्सीजनचा टँकर चालकाने दाखविलेल्या कौशल्यामुळे ऑक्सीजनचा टँकर उलटला असला तरी प्राण वाचविण्यात मात्र चालकाला यश आले आहे.


माढा तालुक्यातील पिंपळखुंटे येथून एक बोलेरो जीप (एम एच ४५ एन १९१६) ही सोलापूरच्या दिशेने निघालेली होती. ही जीप मोहोळ तालुक्यातील यावली शिवारात आली  असताना पाठीमागून आलेल्या ऑक्सीजनचा टँकरने पाठीमागून जोराची धडक दिली. समोर असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जीप असतानाच पाठीमागून वेगात ऑक्सीजनचा टँकर आला. जीपला जोराची धडक बसून जीपमधील प्रवाशांचे प्राण मोठ्या संकटात आलेले असतानाच ऑक्सीजन टँकरने ब्रेक दाबून वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. चालकाने प्रयत्न केला असला तरी  टँकर जीपला पाठीमागून धडकला. जीपला धडक देताच ऑक्सीजनचा टँकर आणि जीप ही दोन्ही वाहने दुभाजकावर जाऊन आदळली. यात ऑक्सीजनचा टँकर मात्र रस्त्यावर पलटी होऊन आडवा झाला. 


या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे पण सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही.  टँकरचालकाने जीपमधील प्रवाशांचे प्राण वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यात ऑक्सीजनचा टँकर पलटी झाला. (Oxygen tanker hits jeep, tanker overturns) रस्त्यावर पालथा झालेल्या  टँकरमध्ये ऑक्सिजन वायू होता त्यामुळे काहीशी भीती निर्माण झाली होती आणि रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 


ऑक्सिजन तज्ञांना बोलावले 

टँकरमध्ये ऑक्सिजन वायू असल्यामुळे टँकर उचलताना काही दुर्घटना घडण्याची भीती होती त्यामुळे पोलिसांनी पुणे येथील ऑक्सिजन तज्ञांना पाचारण केले. या तज्ञांनी पाहणी करून धोका नसल्याचे सांगितल्यानंतर ऑक्सीजनचा टँकर सरळ करण्यात आला आणि वाहतूक विनाव्यत्यय सुरु झाली.   


हे देखील वाचा :

  

अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा