UBOUT US
(SHODH NEWS MARATHI)
https://shodhnewsmarathi.blogspot.com/
आम्ही तुमच्यासाठी 'शोध न्यूज मराठी' हे वेब पोर्टल घेऊन आलो आहे. हे पोर्टल बातमी, घटनांचा मागोवा, महत्वाच्या घटनांचे विश्लेषण असं सगळं काही अचूक आणि वेळेत देता यावं यासाठी हा एक प्रयत्न आहे. हे व्यावसायिक संकेत स्थळ नाही, केवळ माहिती देणे हाच एकमेव उद्देश आहे. आपल्या आजूबाजूला, समाजात रोज वेगवेगळ्या घटना घडत असतात. अनेकदा सोशल मीडियावर चुकीची माहिती येते आणि अफवा पसरण्यास मदत होते. अशा प्रकारच्या अफवा न पसरता, 'नेमकं आणि नक्की काय घडलय' याची माहिती मोठया विश्वासाने देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे !
पत्रकारितेतील ४५ वर्षांचा अनुभव असून साहित्य, चित्रपट क्षेत्रातही तेवढाच प्रदीर्घ अनुभव आहे, चित्रपटासाठी अभिनय, कथा पटकथा, संवाद लेखन केले आहे तसेच नाटक आणि चित्रपट या माध्यमातून अभिनय केला आहे. 'उध्वस्त आभाळ' हा कथासंग्रह आणि 'तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी' हा ग्रंध प्रकाशित आहे. वृत्तपत्रातून विविध सदरातून प्रदीर्घ काळ लेखन केले आहे.
दोन वर्षांपासून ब्लॉग सुरु केला असून त्याद्वारे विविध माहिती, राजकीय, सामाजिक घडामोडींचे विश्लेषण तसेच सर्व घडामोडीच्या बातम्या तत्पर देण्याचा आमचा प्रयत्न असतो, शोध न्यूज ला भेट देणाऱ्यास सतत ताजी माहिती मिळत राहते. ही सर्व माहिती आपणास विनामुल्य मिळते आणि यासाठी कसलेही मूल्य आकारले जात नाही.
मराठी भाषेतील हा ब्लॉग असून मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व असल्यामुळे या भाषेत ब्लॉग लेखन केले जात आहे. वेबसाईटपेक्षा ब्लॉग हा वापरण्यास अत्यंत सुलभ आहे आणि वेळोवेळी समस्यांचा सामना करावा लागत नाही. यासाठी आम्ही ब्लॉगची निवड केली आहे. आपण आमच्या बातम्या तसेच माहितीचा लाभ घ्यावा ही अपेक्षा आहे, धन्यवाद !
आमच्या विषयी
शोध न्यूज मराठी
( MARATHI )
नाव : अशोक बबनराव गोडगे
पत्ता : सोलापुरे नगर, टाकळी रोड, पंढरपूर
जिल्हा सोलापूर (महाराष्ट्र )
संपर्क : भ्रमणध्वनी - ९४२१०२८०८०
email : ashokgodage@gmail.com
web. : https://www.shodhnewsmarathi.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा