Breaking

गुरुवार, जून १६, २०२२

एड्ससारख्या आजारावर उपाय सापडला !


नवी दिल्ली : एच आय व्ही - एड्स सारख्या गंभीर आजारावर देखील उपचार होणे आता शक्य होणार असून यावर उपाय सापडला असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. 


एड्स ही एक मोठी समस्या असून कित्येकांना मृत्यूशी सामना करावा लागला आहे. या आजाराचा फैलाव सुरु झाला तेंव्हा प्रचंड दहशत निर्माण झाली होती. एड्सची भीती आता बोथट झाली असून पुरेशी सावधगिरी बाळगली गेल्याने या आजाराचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. एड्स पूर्णपणे बरा करणारे औषध अथवा उपचार अजूनतरी उपलब्ध नाही पण काही औषधांचा वापर करून एड्सचा प्रादुर्भाव रोखता येतो आणि यामुळे रुग्णांचे आयुष्य काही काळ वाढू शकते. ह्युमन इम्युनोडेफ़िशिएन्सी म्हणजेच एचआयव्ही हा विषाणूपासून पसरतो आणि हा विषाणू शरीरातील इम्यून सिस्टीमवरच आघात करतो. यावर उपचार केला गेला नाही तर एड्स होऊ शकतो.पण या आजारावर देखील तद्यांनी उपाय शोधला आहे. एका लसीची निर्मिती करण्यात यश मिळाले असून केवळ या लसीचा एक डोस घातला तरी एचआयव्ही विषाणूपासून मुक्तता मिळू शकते त्यामुळे हा मोठा दिलासा मानला जात आहे. 


तेल अवीव युनिव्हार्सिटी इस्राईलच्या संशोधकांनी ही लस तयार केली असून या लसीची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल अत्यंत सकारात्मक आला आहे. शरीरातील टाईप बी व्हाईट ब्लड सेलच्या जीनमध्ये वैज्ञानिकांनी काही बदल केले आई एचआयव्ही संसर्ग रोखला आहे. यामुळे एचआयव्ही एड्स सारख्या गंभीर आजारावर उपचार शक्य झाले असून एक नवी आशा निर्माण झाली आहे. २०२० सालात जगात सुमारे ३.७ कोटी रुग्णांना या आजाराचा संसर्ग झालेला होता. त्यावर उपचार व्हावेत यासाठी अभ्यासंकानी बी सेल्सचा वापर केला. या सेल्सच्या जीनमध्ये थोडे बदल केले आणि एचआयव्ही विषाणूच्या काही विशेष भागांच्या संपर्कात आणले गेले. हे केल्याने काही बदल घडून आल्याचे दिसले. त्यानंतरच्या निर्माण झालेल्या बी सेल्समुले हा विषाणू कमकुवत झाल्याचे देखील समोर आले असल्याचे सांगण्यात आले आहे.  


नेचर या मासिकाने सदर अभ्यास अहवाल प्रकशित केला आहे. प्रयोगशाळेत ज्याच्यावर उपचार अथवा परीक्षण करण्यात आले त्यांचे चांगले अहवाल समोर दिसून आले. अँटीबॉडीजची संख्या शरीरात मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचेही दिसून आले आहे शिवाय एचआयव्ही विषाणू संपुष्टात आणण्यात देखील यश मिळाले आहे. (Discovery of vaccine against AIDS)त्यामुळे लवकरच केवळ एका डोसमध्ये हा दुर्धर आजार नष्ट होण्याची आशा आता निर्माण झाली असून जगभरातील कोट्यवधी रुग्णांना नवजीवन मिळण्याची आशा आहे. 


००० 

अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा