Breaking

मंगळवार, जून १४, २०२२

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांनी केली भूमिका स्पष्ट !




देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या असतानाच आणि  राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे नाव चर्चिले जात असतानाच पवार यांनी आपल्या उमेदवारीबाबत मोठे भाष्य केले आहे.

  

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाल २४ जुलै रोजी संपत आहे त्यामुळे देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी मतदान घेण्याची १८ जुलै ही तारीख निवडणूक आयोगाने निश्चित केली आहे. अर्थात या दिवशी राष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी कोन्ग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नाव विरोधाकातून जोरदारपणे समोर आले आहे. शरद पवार हे देशातील जेष्ठ आणि पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ राजकारणात घालविलेले एकमेव नेते आहेत. त्यांनी राष्ट्रपती असावे अशी सर्व सामान्य नागरिकांची इच्छा आहे. पवारांची कारकीर्द आणि त्यांचे जेष्ठत्व, अनुभव विचारात घेऊन त्यांची अविरोध निवड व्हावी अशी अनेकांची अपेक्षा आहे. 


देशभरातून विरोधकातून शरद पवार यांचे नाव राष्ट्रपती पदाच्या विरोधी उमेदवारासाठी येत आहे आणि पवार यांच्याच नावाची चर्चा देश पातळीवर सुरु झाली आहे. देशभर चर्चा सुरु असताना शरद पवार यांनी मात्र जाहीरपणे याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली असल्याचे समोर आले नाही परंतु टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आपण राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत नाही असे शरद पवार यांनी सांगितले आहे. मुंबई येथे झालेल्या पक्ष बैठकीत देखील पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत बोलताना त्यांनी 'आपण विरोधकांचे उमेदवार नसू' असे स्पष्टपणे सांगितले आहे. (Sharad Pawar's role in the presidential election is clea)आपण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही, मी या शर्यतीत नाही' असे देखील पवार यांनी बैठकीत काही मंत्र्यांना सांगितले असल्याची देखील माहिती आहे.


काँग्रेसकडूनही शरद पवार 

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत कॉन्ग्रेस पक्षाकडून देखील शरद पवार यांचेच नाव सुचविण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांना पाठींबा असल्याचे म्हटले होते तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील शरद पवार यांचेच नाव पुढे केले आहे. गांधी आणि पवार यांच्यात फोनवरून चर्चाही झाली होती.    

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा