Breaking

शनिवार, मे २८, २०२२

आगामी पाच दिवसांत मान्सून महाराष्ट्रात !

 


मान्सूनच्या आगमनाचे अंदाज पुढे मागे होत असतानाच आता हवामान विभागाने ताजी माहिती दिली असून आगामी पाच दिवसात म्हणजेच १ जून रोजी मोसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


यावर्षी मान्सून नियमित वेळेच्या आधीच दाखल होईल असा अंदाज आधीपासून वर्तवला जात असून त्याप्रमाणे तो अंदमानात दाखल झाला पण केरळमध्ये मात्र या अंदाजाप्रमाणे तो दाखल झाला नाही. हवामान खात्याचा हा अंदाज चुकल्याचे देखील समोर आले आणि पाऊस काही दिवस लांबणीवर पडणार असे चित्र निर्माण झाले. हवामान विभागाच्या अंदाजाबाबत उलट सुलट प्रतिक्रिया देखील समाजमाध्यमावर उमटू लागल्या होत्या पण आता पुन्हा दिलासा देणारा आनंददायक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिमेकडील वाऱ्याचा जोर वाढल्याने आणि केरळच्या किनारपट्टीवरील ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे पुढील दोन तीन दिवसात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाउस सुरु होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याचे हवामान विभागाचे के एस होसाळीकर यांनी सांगितले आहे. 


हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार आगामी ४८ तासात दक्षिण अरबी सामुर्द्रात मान्सून दाखल होणार आहे. मान्सूनसाठी केरळमध्ये अनुकूल आणि पोषक वातावरण निर्माण झाल्याने १ जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन मोसमी पाउस होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गोवा, कोकण आणि महाराष्ट्रातील काही भागात हा पाऊस पडण्याची शक्यता असून हा पाऊस मध्यम कमी प्रमाणात होण्याचा हा अंदाज व्यक्त केला गेला आहे. (Monsoon on June 1 in Maharashtra) त्यानंतरच्या पुढच्या काही दिवसात मात्र राज्यभर मोसमी पाऊस होईल 


पोषक वातावरण 
श्रीलंकेत असलेला मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे मान्सूनची गती वाढली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात १ जून रोजी मान्सून दाखल होईल. नियमित वेळेच्या आधीच तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे. सद्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना मान्सूनची अधिक प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही.  


काही भागात पाऊस !

महाराष्ट्रात पूर्वमोसमी पाउस ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या प्रमाणे सद्यस्थितीत नसून ५ जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात काही भागात पावसाचा शिडकावा होऊ शकेल आणि त्यानंतर १३ ते २३ जूनच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा