Breaking

शनिवार, मे २८, २०२२

कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचा महाराष्ट्रात शिरकाव !



मुंबई : कोरोना पुन्हा वाढू लागला असून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन  आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असतानाच चिंताजनक बातमी समोर आली असून कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने महाराष्ट्रात शिरकाव केला असून पुण्यात सात रुग्ण आढळले आहेत. 


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो अजून पूर्णपणे संपला नाही त्यामुळे खबरादारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार हे सतत करत आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेची तलवार टांगती असतानाच नव्या व्हेरीयंटचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्याने आता चिंतेत अधिक भर पडली आहे. B.A.4 आणि B.A.5 या दोन्ही वेरीयंटने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे (New variant of Corona entry in Maharashtra )आणि दोन्ही वेरीयंटचे मिळून सात रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. 


B.A.4 आणि B.A.5 या दोन्ही वेरीयंटमुळे जगात चिंता निर्माण झाली असतानाच तो आता महाराष्ट्रात आणि पुण्यात दाखल झाला आहे. पुण्यात B.A.4  चे चार आणि B.A.5 चे तीन रुग्ण आढळल्याचे बी जे मेडिकल कॉलेजच्या समन्वयाने करण्यात आलेल्या  जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे आता चिंता वाढली असून प्रत्येकाने खबरदारी घेण्याची अत्यावश्यकता निर्माण झाली आहे. मागील २४ तासात महाराष्ट्रात ५२९ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून उपचार घेत असलेल्या ३२५ रुग्णाना घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा रिकव्हरी दर ९८.०९ टक्के झाला आहे. पुण्यात आढळलेल्या नव्या व्हेरीयंट ने मात्र पुन्हा चिंता वाढवली आहे.  


दोन अडीच वर्षे कोरोनाने जगणे आणि मरणे देखील कठीण केले होते. तिसरी लाट पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत तितकीशी प्रभावी ठरली नाही परंतु काही प्रमाण का होईना पण तिसऱ्या लाटेने देखील नुकसान केले आहे. तिसरी लाट संपण्याआधीच चौथी लाट येण्याची चर्चा सुरु झाली होती. काही दिवस गेल्याने चौथी लाट आता येणार नाही असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट असेल असे आधीपासूनच अभ्यासकांनी सांगितलेले आहे त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णांची अधिक चिंता निर्माण होऊ लागली आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरत गेल्याने राज्य सरकारने निर्बंध हटवले आहेत पण तरीही गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर अवश्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून केंद्र शासनाने आधीच राज्यांना सूचना केलेल्या आहेत. कोरोनाला अटकाव करणारी पंचसूत्री पाळण्याचे आवाहं केले आहे यात मास्क, सामाजिक अंतर, लसीकरण यांचाही समावेश आहे परंतु राज्य शासनाने राज्यातील परिस्थिती लक्षात घेत मास्कची सक्ती केली नाही. आज मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्ण वाढत असल्याचे सांगत कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. (Increase in corona patients In Maharashtra) मुंबईसह राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत होता परंतु आता मुंबईमध्ये दर दिवशी सरासरी दोनशे रुग्ण आढळून येवू लागल्याने शासन आणि आरोग्य विभाग अधिक सर्तक झाला आहे. 


सर्व रुग्ण पुण्यातील !

नव्या व्हेरीयंट चे सर्व सात रुग्ण हे पुण्यातील असून त्यांना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. ४ ते १८ मे या कालावधीतील हे रुग्ण असून या रुग्णांपैकी चार पुरुष तर तीन महिला आहेत. सदर रुग्ण २० ते ४० या वयातील असून यातील एक रुग्ण मात्र १० वर्षाच्या आतील आहे. 


चौथ्या लाटेचा धोका कायम 
देशातील कोरोनाची तिसरी लाट जवळपास संपली आहे परंतु कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे. मुंबई तसेच पुणे या शहरात राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. 


मास्क आवश्यक !
कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे परंतु कोरोना पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे प्रत्येकाने दक्षता बाळगावी आणि मास्कचा वापर करावा, लसीकरण करून घ्यावे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे ते वाढविण्यात यावे असे आवाहन  देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले आहे.  


हे देखील वाचा : पालकमंत्री बदलणे म्हणजे भाजीपाला आहे काय ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा