Breaking

शुक्रवार, मे २७, २०२२

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली !

 


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


गेल्या काही काळापासून अटकेत असलेले अनिल देशमुख यांच्या पृकृतीच्या तक्रारी अलीकडे वाढत असतानाच आता त्यांना छातीत दुखणे, उच्च रक्तदाब आणि खांदे दुखणे अशा प्रकारचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. देशमुख  यांच्यावर शंभर कोटींच्या खंडणीचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास इडी आणि सीबीआय करीत आहे. (NCP leader Anil Deshmukh's health deteriorated)मागील वर्षी देशमुख यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यांना अटक झाल्यानंतर देशमुख आता न्यायालयीन कोठडीत आहेत.


अनियंत्रित उच्च रक्तदाब आणि छातीत दुखण्याचा त्यांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळत आहे.  नोव्हेंबर २०२१ मध्ये अनिल देशमुख यांना ईडी ने अटक केली होती तेंव्हा सुरुवातीच्या काळात देशमुख यांच्यावर खाजगी रुग्णालयात खांद्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी एका याचिकेद्वारे न्यायालयात परवानगी मागितली होती परंतु ही मागणी फेटाळून लावत न्यायालयाने जे जे रुग्णालयात उपचार घेऊ शकतात असे सांगितले होते. 


परमबीर सिंगांनी केले होते आरोप 

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी खंडणी आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आणि मोठे आरोप केले होते. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्या कार्यालयावर आणि घरावर वारंवार छापे टाकले होते. अनेक दिवस बेपत्ता राहिल्यानंतर देशमुख यांना ईडी ने अटक केली होती. याच प्रकरणात त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा