Breaking

रविवार, मे २९, २०२२

दुचाकीला ट्रकची धडक, तरुणाचा जागीच मृत्यू !

 



करमाळा : भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून आज सकाळी या अपघाताची (Accident) घटना घडली.


सोलापूर - अहमदनगर महामार्गावर करमाळा तालुक्यातील मांगी येथील पुलावर ट्रक ( टी एन ५२ एल ९०६५) आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला. मांगी येथील टोळनाक्याच्या जवळ भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याचे दुचाकीवरील (एम एच ४५ एएन ३०६४) तरुण वसंत मारुती शिंदे (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर तरुण हा करमाळा तालुक्यातील देवळाली गावचा असून या घटनेने देवळालीत प्रचंड हळहळ व्यक्त होवू लागली आहे. मांगी टोळनाक्याच्या पुढच्या बाजूस रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे थांबलेल्या वसंत शिंदे यांना वेगात आलेल्या ट्रकने उडवले. करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रकचालकास ताब्यात घेण्यात आले आहे. 


ट्रकने जोरदार धडक दिल्याने वसंत शिंदे हे खाली पडले आणि यावेळी त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला. थेट डोक्यावर आपटल्यामुळे आणि यात मोठा मार बसल्यामुळे शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या या घटनेने देवळाली गाव शोकाकुल झाले असून वसंत हे त्यांच्या कुटुंबातील कर्ते पुरुष होते त्यामुळे कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. देवळाली गावकरी रस्ता ठेकेदारावर संतप्त असून ठेकेदार याच्यावरच कारवाई करावी अशी मागणी गावकरी करू लागले आहेत कारण खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला आहे.   


हे देखील वाचा :>>>>

खालील बातमीला टच करा !


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा