Breaking

शनिवार, जुलै ०९, २०२२

आषाढी यात्रा पार्श्वभूमीवर ८९ जण हद्दपार !




पंढरपूर : आषाढी यात्रेत काहीही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून तब्बल ८९ जणांना हद्दपार करण्याची कारवाई जिल्हा पोलिसांकडून करण्यात आली आहे.


पंढरपूर येथील आषाढी यात्रेच्या निमित्ताने प्रशासनाने भाविकांसाठी सर्व त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच त्यांच्या सुरक्षेची देखील जबाबदारी प्रशासन घेत आहे. मोठा फौजफाटा पंढरीत तैनात करण्यात आला असून यात्राकाळात गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. या काळात चोऱ्या, घरफोड्या, भाविकांची लुटमार असे कुठलेही प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी बारीक नजर ठेवली आहे आणि त्यासाठी खास पथकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत अशा प्रकारच्या कुठल्याच घटना घडू नयेत यासाठी पोलीस विभागाने तब्बल ८९ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. 


यात्रा कालावधीत लाखो भाविक येथे येत असतात. पोर्णिमेपर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे गर्दीचा गैरफायदा घत चोरांचाही सुळसुळाट वाढत असतो. इतर भागातील चारटेही यामध्ये सामील होतात. त्यामुळे चोर्‍या, लूटमारी सारख्या घटना रोखण्यासाठी साध्या, वारकरी वेषातील पालिसांची पथक तेनात करण्यात आले आहे विविध जिल्ह्यांमधील गुन्हेगारांना आळखू शकणाऱ्या पालिसांची देखील यात्रेत  नियुक्‍ती करण्यात आली आहे. महिला वारकऱ्यांच्यासुरक्षेसाठी निर्भय पथकाचे पोलीस कर्मचारी अखंड कार्यरत आहेत. 


शहर हद्दीतील अवैध दारू विक्रते, अवैध वाळ व्यवसाय करणारे, मटका बुकी चालकांसह शरीर व मालाविषयी गंभीर अशा दोन  किंवा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ८९ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव शहर पोलिसांनी वरिष्ठांकडे सादर केलेले होते,  त्यानुसार प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी संबंधित ८९ लोकांना दि. ७ ते १३ जुलै या कालावधीसाठी शहर व तालुका हद्दीत प्रवश न करण्याचे आदेश पारित केले. याबरोबरच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाण अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्या टोळीतील सराईत, टोळी प्रमुख विक्रम संजय अभंगराव (रा.अंबाबाई पटांगण), सदस्य समाधान चंद्रकांत शिंदे (रा.गोविंदपुरा) व खूद्रश राजाराम फाळके (रा.आढीव ) यांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यानसार सदर तिघांना पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, माढा व माळशिरस  या सहा तालुक्यांतून एक वषासाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिले. (Eightynine criminals deported from Pandharpur )


उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरूण पवार यांच्या मागदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस  निरीक्षक सी.व्ही. केंद्रे, सहाय्यक पोलीस फौजदार दत्तात्रय आसबे, हवालदार सुरज हंबाडे, पोलीस नाईक सचिन इंगळे सुनिल बनसाडे, दादा माने, राकेश लोहार, शोएब पठाण, सचिन हेंबाडे, सुजित जाधव, समाधान माने यांच्या पथकाने संबंधित लाकांना आदेशाची बजावणी करून कारवाई केली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा