Breaking

मंगळवार, मे ३१, २०२२

कोरोना रुग्णांची पुन्हा मोठी वाढ !

 


मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागल्यानंतर राज्यातील निर्बंध हटविण्यात आले परंतु कोरोना रुग्णांची  रोज वाढ होत असून गेल्या चोवीस तासात नव्या ७११ रुग्णांची वाढ झाली आहे.

 
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा मोठा  फटका सहन करावा लागला त्यानंतर तिसरी लाट आली परंतु पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत तितकीशी प्रभावी ठरली नाही. कोरोनाची तिसरी लाट परतण्याच्या मार्गावर असतानाच चौथ्या लाटेची चर्चा सुरु झाली होती. या लाटेबाबत अभ्यासकांतही मतमतांतरे दिसून येत होती. जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती आणि जून महिना जवळ येवू लागला तसे कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होताना दिसू लागली आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्र शासनाने आधीच राज्याचा सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत आणि आता राज्यातील रुग्णसंख्या वाढीला लागताच महाराष्ट्र शासन देखील अलर्ट मोडवर आलेले आहे. 


राज्याच्या अनेक जिल्ह्यात हळूहळू कोरोना रुग्ण वाढ होताना दिसत असून मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात पुन्हा कोरोना डोके वर काढू लागला आहे. पुण्यात तर नव्या व्हेरीयंट चे सात रुग्ण आढळले असून यातील एक रुग्ण हा दहा वर्षे वयाच्या आतील आहे. राज्यात मागील २४ तासत ३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत पण नवी वाढ ७११ रुग्णांची झाली आहे. (Increase in corona patients in Maharashtra) रुग्णवाढीचा वेग मुंबईत सर्वाधिक असून राज्याच्या विविध भागात कमी प्रमाणात का होईना पण रुग्ण वाढताना दिसत आहेत. 


राज्यात साडे तीन हजार
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या हळू हळू वाढत असताना आता ही संख्या ३ हजार ४७५ वर जावून पोहोचली आहे. यातील २ हजार ५२६ रुग्ण हे मुंबईतील असून ४१३ रुग्ण हे ठाणे येथील आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८ टक्के आहे तर मृत्यू दर १.८७ टक्के आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा