Breaking

बुधवार, जून ०१, २०२२

ई डी चा निशाणा आता सर्वोच्च नेत्यांकडे !

 


नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थात ई.डी. च्या कारवायामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते त्रस्त झाले असताना आता ई.डी. चा निशाणा काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्याकडे लागला आहे.  


गेल्या काही वर्षात रोज ई डी हे नाव ऐकायला मिळते आणि भल्याभल्यांची धडकीही भरते आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते आणि महाविकास सरकार मधील काही मंत्री तुरुंगात गेले आहेत तर काहींच्या चौकशा सुरु आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा आजवर सहसा कुणाला माहित नव्हत्या पण आता त्या प्रत्येक नागरिकांना माहित झाल्या आहेत. भारतीय जनता पक्ष या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप होत आहे आणि या कारवाया बिगर भाजप नेत्यांवरच होत आहेत (Ed's notice to top Congress leaders) त्यामुळे या आरोपात सगळ्यांनाच आता तथ्य वाटू लागलेले आहे. 


महाराष्ट्रासह ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही अशा ठिकाणी या संस्थेचा वावर अधिक असून राज्य पातळीवरील अनेक नेत्यांना सक्तवसुली संचालनालयाचा मोठा फटका बसला आहेच. भाजपकडून या यंत्रणांचा सतत गैरवापर होत असल्याचा आरोप देखील रोज होत आहे. राज्यपातळीवरील नेत्यांना या संस्थेने झटका दिलेलाच आहे पण आता तो काँग्रेस पक्षाच्या सर्वात वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहोचताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गंदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आता नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 


चौकशी पूर्वीच बंद !

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ई डी ने २०१५ सालीचा चौकशी थांबवली होती पण या सरकारला ते पहावले नाही. संबंधित ई डी अधिकाऱ्याला हटवून नव्या अधिकाऱ्याला सरकारने हाताशी धरून जुन्या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरु केला आहे असे माजी केंद्रीय मंत्री अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे.


आणखी नेते रडारवर 

ममता बॅनर्जी, फारूक अब्दुल्ला यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत असा गोप्यस्फोट करून सिंघवी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. 


भीती दाखविण्यासाठीच -- 

१९४२ साली हेरॉल्ड वर्तमानपत्र सुरु झाले होते तेंव्हा इंग्रजांनी दबाव टाकला होता आणि आज केंद्रातील मोदी सरकार देखील तेच करू लागले आहे आणि त्याच्यासाठी ईडीचा वापर करीत आहेत. त्यातुनच भीती दाखविण्यासाठी ईडीची नोटीस सोनिया गांधी आणि राहुल गांधी याना देण्यात आली असल्याचाही आरोप काँग्रेसने केला आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा