Breaking

रविवार, मे २९, २०२२

सोलापूर - पुणे हुतात्मा एक्स्प्रेस पुन्हा सुरु !

 



सोलापूर : गेल्या १७ दिवसांपासून बंद असलेली सोलापूर - पुणे हुतात्मा एक्सप्रेस गाडी पुन्हा ३० मे पासून पूर्ववत धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.


सोलापूर येथून सुटणारी सोलापूर - पुणे हुतात्मा एक्सप्रेस ही प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असून या रेल्वेला सतत प्रवाशाची गर्दी असते परंतु मध्य रेल्वेने दौंडजवळील कुरकुंभ मोरी येथील भुयारी पुलाच्या कामासाठी म्हणून तब्बल सतरा दिवसांचा ब्लॉक घेतलेला होता. सदरचे काम करायचे असल्यामुळे ही रेल्वे १७ दिवसांसाठी बंद होती परंतु आता ती पूर्ववत धावणार असून ३० मे पासून सकाळी साडे सहा वाजता सोलापूर स्थानकावरून सुटणार आहे. दौंड यार्डमध्ये रोड अंदर ब्रिज बांधण्यासाठी हा सतरा दिवसांचा ब्लॉक रेल्वे विभागाने घेतला होता. दिनांक १३ मे ते २९ मे अशा कालावधीसाठी हा ब्लॉक होता. सदर ब्लॉकमुळे दोन्ही बाजूंच्या रेल्वे वेळापत्रकावर परिणाम झाला होता आणि  रेल्वे उशिराने धावत होत्या. 

 

सदरचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे आता ३० मे पासून ही रेल्वे नियमित धावणार आहे. गेल्या सतरा दिवसांपासून या कामामुळे प्रवाशांचा खोळंबा तर होत होत होताच पण हुतात्मा एक्सप्रेस बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. आता पुन्हा ही रेल्वे सुरु होत असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात देखील रेल्वे पूर्णपणे ठप्प असल्याने मोठी अडचण झाली होतीच परंतु त्यानंतर निर्बंध हटले आणि रेल्वे पुन्हा सुरु झाली पण कामासाठी म्हणून हुतात्मा एक्सप्रेस बंद ठेवण्यात आली होती. (Solapur-Pune Hutatma Express resumes from tomorrow)ती आता उद्यापासून पूर्ववत आणि निर्धारित वेळेत धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा