Breaking

सोमवार, जून ०६, २०२२

पत्नीचे अनैतिक संबंध, पतीने गळफास घेत केली आत्महत्या !

 



उस्मानाबाद : परिचारिका असलेल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाला वैतागून अखेर पतीने झाडाला गळफास घेवून आपल्याच जीवनाचा शेवट करून घेतल्याची विदारक घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे.


विवाहानंतर देखील पुरुष अन्य महिलांशी अनैतिक संबंध ठेवत असतात हे अनेकदा समोर येत असते. अशा प्रकरणामुळे संसारात विष पडते आणि विवाहित महिला आत्महत्या करतात. उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ पतीवर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोंड येथील सतीश कवरसिंग तिवारी या तरुणाचा विवाह ढोकी येथील स्वाती ठाकूर सोबत झाला होता. स्वाती ही ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करीत होती. या दांपत्यास एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गेल्या तीन वर्षांपासून मात्र दोघात सतत वाद होत होते. पत्नीच्या चारित्र्याच्या विषयावरून दोघात सतत भांडण होत असल्याचे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत.  

 
पती सतीश तिवारी हे आपली पत्नी स्वातीसमवेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवासस्थानात राहत होते. सतीश यांना आधीपासूनच पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत संशय होताच  पण ३१ मे रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या डोळ्यांनी अनैतिक प्रकार पहिला आणि त्यांचा संशय खात्रीत रुपांतरीत झाला. विवेक देशमुख नावाच्या व्यक्तीसोबत असलेली पत्नी स्वातीला त्यांनी पहिले. सतीश यांनी दोघानाही याबाबत जाब विचारला तेंव्हा या दोघीही सतीश याला बेदम मारहाण केली. या घटनेबाबत सतीश याने ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 
पत्नीच्या अनैतिक वागण्याने सतीश आधीपासूनच अस्वस्थ होते आणि त्यांनी पत्नीला वेळोवेळी समजाऊन सांगण्याचा प्रयत्न देखील केला होता पण स्वातीच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता. (Husband commits suicide due to wife's immoral relationship) काही केल्या स्वाती आपल्या प्रियकराला सोडायला तयार होत नव्हती त्यामुळे सतीश निराश  झालेला होता. 


झाडाला घेतला गळफास 


पत्नीच्या वागण्यात काहीच फरक पडत नसल्याने निराश झालेल्या सतीशने आपल्या कोंड गावात जाऊन शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आणि आपलेच जीवन संपवले. सतीश यांचे भाऊ उमेश तिवारी यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार स्वाती आणि विवेक देशमुख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   


नातेवाईक आक्रमक !


आत्महत्येच्या या घटनेनंतर सतीश तिवारी यांचे नातेवाईक आक्रमक झाले आणि स्वाती तसेच विवेक देशमुख याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. पोलिसांनी तातडीने सतीशच्या पत्नीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर सतीश तिवारी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.     



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा