Breaking

मंगळवार, मे २४, २०२२

भीषण अपघात : आठ जणांचा जागीच मृत्यू तर सव्हीस जखमी !

 





हुबळी : कोल्हापूरकडून हुबळीकडे निघालेल्या खाजगी प्रवासी बसचा मोठा  अपघात होऊन ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २६ जण  अधिक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


हुबळी धारवाडच्या तरीहाळा बायपासवर ही दुर्घटना मध्यरात्री घडली असून या अपघातात आठ जण जागीच ठार झाले असून यातील सहा जण हे कोल्हापूर आणि पुणे येथील असल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर येथून कर्नाटकमधील हुबळी येथे निघालेल्या बसची आणि तांदूळ वाहतूक करणारा ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा मोठा अपघात झाला आहे.  कोल्हापूर पुणे येथील सहा आणि कर्नाटकमधील दोघांचा मृतात समावेश आहे. या अपघातात सव्हीसपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना हुबळी येथील किम्स रुगणालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांचावर उपचार सुरु आहेत. 


बंगळूर येथे जाण्यासाठी कोल्हापूर येथील खाजगी प्रवासी बस कोल्हापूर येथून प्रवासी घेवून निघाली होती. हुबळी येथील बायपासवर ही बस आल्यानंतर बस चालकाने एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या बसची  तांदूळ घेऊन निघालेल्या ट्रकशी जोरदार धडक झाली.  यावेळी मोठा आवाज झाला आणि बसमधील प्रवाशात आरडओरडा सुरु झाला. मध्यरात्री अर्धवट झोपेत असलेल्या प्रवाशांची झोप उडाली आणि एकच गोंधळ सुरु झाला. या अपघातात बसचे प्रचंड नुकसान झाले असून समोरचा भाग पूर्ण उध्वस्त झाला आहे तर ट्रकचे देखल पुढच्या बह्गाचे मोठे नुकसान झाले आहे (Eight killed in passenger bus and truck accident) बस मधील प्रवाशात प्रचंड अफरातफर माजली.


सलग दुसरा अपघात


धारवाड येथे दोनच दिवसांपूर्वीच झालेल्या अपघातात सात जण जागीच ठार झाले होते. सात जणांच्या मृत्युसह दहा  जण जखमी जालेले होते. 
 त्यानंतर आज पुन्हा हा दुसरा अपघात झाला.  यात देखील ८ जणांचा मृत्यू झाला आहे.  

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा