Breaking

मंगळवार, जून ०७, २०२२

बारावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी घोषित होणार !


मुंबई : विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेला बारावीचा निकाल उद्या दुपारी लागत असून निकालाला उशीर होण्याचे तर्क आता फेल ठरलेले आहेत हेच  समोर आले आहे. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या गेलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लांबणीवर पडेल अशी चर्चा आणि भीती देखील व्यक्त होत होती परंतु निकाल वेळेत येतील असे सांगितले जात होते त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात होते. आता मात्र हा संभ्रम दूर झाला असून बारावीचा निकाल उद्याच ८ जून रोजी दुपारी एका वाजता जाहीर होणार आहे.   जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा निकाल येईल अशी अपेक्षा होती आणि आता शिक्षण विभागाकडूनच या निकालाबाबत घोषणा करण्यात आली आहे. (Twelfth exam results will be announced Tomorrow) त्यामुळे परीक्षार्थींची धाकधूक वाढली असून उद्या दुपारी चित्र स्पष्ट होणार आहे.

   
बारावीचा हा निकाल ऑनलाईन देखील पाहता येणार आहे. शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे. mahresult.nic.in आणि msbshse.co.in या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध असणार आहे. या संकेतस्थळाच्या होमपेजवरील निकाल या पर्यायावर क्लिक केल्यास नवीन पेज येईल. महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२२ या लिंकवर क्लिक केल्यास लॉग इन पानावर रोल क्रमांकासह अन्य काही माहिती समाविष्ट करावी लागेल. सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट बटण क्लिक करताच स्क्रीनवर तुमचा हवा असलेल्या रोल क्रमांकाचा निकाल दिसेल. संकेतस्थळावरून डाऊनलोड आणि प्रिंट घेण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. 


परीक्षा उशिरा झाली पण --
बारावीची परीक्षा पंधरा दिवस उशिराने सुरु झाली आणि त्यानंतरही शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली. अशा अडचणीमुळे यावेळी निकालास उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु बोर्डाने या अडचणीवर मात करीत मार्ग काढले आणि आता वेळेतच उद्या निकाल जाहीर होत आहे.


दहावीचा निकाल कधी ?
बारावीचा निकाल उद्या जाहीर होत असतानाच आता दहावीचा निकाल कधी लागतोय याकडे विद्यार्थी आणि पालक यांचे लक्ष लागलेले आहे. शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाबाबत अद्याप काहीच अधिकृत घोषणा केलेली नाही परन्तु आगामी दहा दिवसात दहावीचा निकाल येऊ शकतो असे सांगितले जात आहे. दहावीच्या परीक्षेस १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४७ हजार ४८७ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या.  
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा