Breaking

सोमवार, जुलै ०४, २०२२

काय झाडी....समदं ओक्के, पन्नास खोके पक्के ! नवा व्हिडीओ व्हायरल !



"काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, ओक्केमदी हाय" हा सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा फोनवरील संवाद राज्यभर तर गाजलाच, पण त्यावर काही गाणी देखील आली आहेत. बंडखोरी करून आ, शहाजीबापू पाटील हे गुवाहाटी येथे गेले असताना त्यांनी आपल्या एका समर्थकाला फोनवरून तेथील निसर्ग वर्णन आणि आपली कशी मजा आहे हे फोनवरून सांगितले होते आणि हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही क्लिप एवढी व्हायरल होईल याची कुणालाही अपेक्षा नव्हती पण कमाल झाली आणि राज्यभर  " काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, समदं ओक्केमदी हाय " ही एकच चर्चा सुरु झाली. 


अनेक व्हिडीओ, ऑडीओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल होत असतात पण आमदार शहाजीबापू पाटील यांची ही क्लिप अनपेक्षितरित्या प्रचंड व्हायरल झाली आणि गेल्या काही दिवसांपासून वाजतगाजत राहिली. कुणी मनोरंजन म्हणून याकडे पहिले तर कुणी या संवादाबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे.  टीका देखील तितक्याच प्रमाणात झाली असून हा सगळा प्रकार काही काळ विसरला जाणार नाही. काँग्रेसचे आमदार  कैलास गोरंट्याल यांनी मात्र पत्रकारांशी बोलताना तशाच प्रकारे संवाद म्हटले आणि त्यात काहीशी जोड देवून बंडखोर आमदारावर प्रहार केला आहे. 

काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपला एका व्हिडीओ ट्वीट केला असून " काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, समदं ओक्के, पन्नास खोके पक्के !"

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आणि गुवाहाटी गाठली. या घटनेने टीका टिपण्णी तर झालीच पण पन्नास कोटीचे आरोप देखील होत राहिले. एका आमदारांचा एक संवाददेखील प्रकाशात आला असून पन्नास कोटींची ऑफर दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावरच आमदार कैलास गोरंट्याल यांचा हा व्हिडीओ देखील समाज माध्यमावर तुफान व्हायरल होत असून तो मोठ्या संख्येने पहिला देखील जात आहे. 




अधिक बातम्यांसाठी / येथे क्लिक / करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा