Breaking

गुरुवार, जून ०९, २०२२

महाविकास आघाडीला न्यायालयात मोठा झटका !

 



मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण गरमागरम असतानाच महाविकास आघाडीला मोठा झटका बसला असून त्यांची दोन मते कमी होताना दिसत आहेत.


राज्यसभेच्या निवडणुकीच्या विषयाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून तर निघाले आहेच पण चांगले तापलेही आहे, विधान परिषद निवडणुकीनेही राज्याच्या राजकारणात रंग भरायला सुरुवात केली आहे. मतांच्या आकड्यांची जुळवाजुळव करण्यात भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीचे जोरदार प्रयत्न सुरु असतानाच महाविकास आघाडी अडचणीत येताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन वरिष्ठ नेते इडीच्या कोठडीत आहेत आणि त्यांना मतदान करता येणार नाही असे आज स्पष्ट झाले आहे. राज्य सभेच्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता परंतु हा अर्ज न्यायालये फेटाळून लावला आहे.

 
राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांनी न्यायालयात अर्ज केल्यानंतर ईडी ने त्यांना मतदानासाठी परवानगी देण्यास न्यायालयात हरकत घेतली होती.  या विरोधानंतर न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीनंतर दोघांचेही अर्ज फेटाळून लावले आहेत त्यामुळे आता त्यांना राज्य सभेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. अर्थातच प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीची दोन मते कमी झाली आहेत (Big shock to Mahavikas Aghadi in court) त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा झटका मानला जात आहे.  


न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी केलेल्या अर्जावर ईडीने आपले मत न्यायालयाकडे सादर केले होते आणि दोघांच्याही मतदानासाठी मागितलेल्या परवानगीला विरोध दर्शविण्यात आलेला होता. दोन्ही नेत्यांनी केलेला अर्ज अखेर आज न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे दोघानाही राज्य सभेच्या निवडणुकीत आता मतदान करता येणार नाही आणि हा महाविकास आघाडीला धक्का आहे. 


अपीलाची शक्यता 

न्यायालयाने दोन्ही नेत्यांचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर आता ते मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्याची शक्यता आहे. राज्य सभा निवडणुकीत मतदान करणे महत्वाचे असल्यामुळे उच्च न्यायालयात ते जाऊ शकतात परंतु वेळ कमी असल्यामुळे एवढ्या तातडीने सुनावणी होऊ शकेल की नाही याबाबत शंका आहे. एकंदर या प्रकरणामुळे राज्यातील महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याचे सद्या तरी दिसत आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा