Breaking

बुधवार, जून ०८, २०२२

कोरोनाच्या रुग्णवाढीने महाराष्ट्राची चिंता वाढली !

 


मुंबई : कोरोनाच्या वाढत्या आक्रमणामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा वाढवली असून आज मोठ्या संख्येने नवी कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 


जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट येवू शकते हे आधीपासूनच सांगितले जात होते आणि आता मोठ्या वेगाने रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. काल राज्यात एका दिवसात १ हजार ८८१ रुग्णांची नोंद झाली होती तर आज २ हजार ७०१ नवे रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. मागील दोन महिन्यातील ही सर्वाधिक वाढ असून मुंबईत तर १ हजार ७६५ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राची देखील चिंता आता अधिक वाढताना दिसत आहे. सुदैवाने आज १ हजार ३२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून राज्यभरात आज एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. महाराष्ट्रात सद्या ९ हजार ८०६ रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या तीन दिवसात राज्यात एकही कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू झाला नाही. 

 
कोरोनाचा राज्यातील मृत्युदर १.८७ एवढा असून कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७७ लाख ४१ हजार १४३ एवढी झाली असून वाढत्या रुग्णांमुळे शासन आणि प्रशासन पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आलेले आहे. शासनाने आरोग्य व्यवस्थेला सतर्क राहण्यास सांगण्यात आले असून राज्यभरात कोरोनाच्या टेस्ट वाढविण्याबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत. लसीकरण करून घेण्याबाबत आणि मास्कचा वापर करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आग्रहाचे आवाहन केलेले आहे. (Corona raised concerns in Maharashtra) नागरिकांनीच आता कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक बनले आहे अन्यथा मोठ्या संकटाला पुन्हा तोंड देण्याची वेळ येऊ शकते. 


विभागावर रुग्णवाढ 
आज मुंबई विभागात २ हजार ४३८ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर नाशिक विभागात १२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. पुणे विभागात मात्र  आज २०१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाल्याची नोंद झाली आहे. पुणे विभागात पुणे शहर. पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर आणि सातारा असा समावेश आहे. कोल्हापूर विभागात ८, औरंगाबाद विभागात २, लातूर विभागात ७, अकोला विभागात १३ आणि नागपूर विभागात २० असे नवे कोरोना रुग्ण आज आढळून आले आहेत.     




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा