Breaking

रविवार, जून १२, २०२२

मुंडे समर्थकांनी रोखला प्रवीण दरेकरांचा ताफा

 


बीड : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने समर्थकात मोठी नाराजी असतनाच आज संतप्त समर्थकांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर यांचा ताफा रोखला आणि आपल्या संतापाला वाट करून दिली. 


राज्याची विधान परिषद निवडणूक होत असून भारतीय जनता पक्ष तसेच महाविकास आघाडीनेदेखील आपले उमेदवार निश्चित केले आहेत. भारतीय जनता पक्ष यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे याना उमेदवारी देईल अशी समर्थकांत अपेक्षा होती. भारतीय जनता पक्षासाठी गोपीनाथ मुंडे यांनी प्रचंड काम केले असून भाजपला बहुजनांचा चेहरा गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता. भारतीय जनता पक्षात वजन असलेले नेते म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे याना पक्षाने पुरेसे बळ दिले नाही अशी पंकजा मुंडे समर्थकांची भावना आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर विधानपरिषदेतून त्यांना संधी दिली जाईल असे अनेकांना वाटले होते आणि समर्थकांची तर तशी मागणीच होती परंतु भारतीय जनता पक्षाने मुंडे याना डावलले आहे. 


मुंडे याना पक्षाने डावलल्यामुळे मुंडे समर्थक प्रचंड अस्वस्थ आणि नाराज देखील आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना प्रचंड संतप्त आहेत त्यातच आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुंडे समर्थकांनी त्यांचा ताफा रोखला. बीड शहरातील बार्शी रोडवर धांडेनगर परिसरात अचानक हा प्रकार घडला. विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमास उपस्थित राहून नंतर तेथून ते पुढे निघाले असताना मुंडे समर्थकांनी जोरदार राडा केला. प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रवीण दरेकर यांची गाडी न थांबल्याने मुंडे समर्थक थेट गाड्यासमोर आडवे झाले 


प्रवीण दरेकर यांच्या दौऱ्यात अचानक हा प्रकार घडला त्यामुळे पोलिसांची देखील तारांबळ उडाली. पोलिसांनी मुंडे समर्थकाना बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. (Munde supporters block Praveen Darekar's convoy) या सर्व प्रकारात  काही मुंडे समर्थक  तसेच एक पोलीस देखील जखमी झाला. मुंडे समर्थक किती संतप्त आहेत हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.    


मुंडे भगिनींवर अन्याय 

भारतीय जनता पक्षासाठी प्रचंड परिश्रम घेणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या अन्याय सहन करीत आहेत, खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देणे भाजपने टाळले तर आता त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे याना विधान परिषदेत संधी दिली नाही. जाणीवपूर्वक त्यांचा पत्ता कट केल्यामुळे आता पंकजा मुंडे काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा