Breaking

शनिवार, जून ०४, २०२२

अजितदादा पवार म्हणाले, "अरे, जरा तरी भान ठेवा "!

 


पिंपरी : बारामतीकरांनी पार डिपॉझिट जप्त केलंय तरी कळेना, अरे जरा भान तरी ठेवा" अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आ. गोपीचंद पडळकर याना टोला लगावला आहे. 


भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्या विधानाबाबत नेहमीच वादग्रस्त ठरत आहेत. अशा विधानामुळे त्यांच्या व्यक्तिगत प्रतिमेला आणि पक्षालाही धक्का लागण्याचा धोका असल्याचे मत व्यक्त होत असते. समाजमाध्यमांवर देखील अनेक जण अशा प्रकारची मते व्यक्त करताना दिसतात.  राजकरणात टीका टिपण्णी स्वाभाविकच आहे पण यावेळी शब्दांची मर्यादा पाळणे गरजेचे असते अन्यथा त्याचा उलट परिणाम देखील होण्याच्यी शक्यता अधिक असते. अशा प्रकारच्या विधानांवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. गोपीचंद पडळकर यांची खिल्ली उडवत टोले लगावले आहेत. (Ajit Pawar's criticism of Gopichand Padalkar) अजितदादा मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तळेगाव दाभाडे परिषदेच्या विकास कामाचे उदघाटन आणि लोकार्पण कार्यक्रमात बोलताना पवार यांनी खास आपल्या स्टाईलमध्ये पडळकर यांच्यावर हल्ला चढवला. 


अजितदादा म्हणाले ---
"आपल्याला आमदार केलं म्हणजे आपण खूप मोठे झालो आहोत असं काहींना वाटतं. बारामतीकरांनी डिपॉझिट जप्त केलं तरी कळेना.... काय बोलावं? किती बोलावं? याचं काही तरी भान ठेवावं की ! कमरेखालचे आरोप करता, महिलाही ऐकत असतात याचं भान ठेवा, काही तारतम्य बाळगा !"  

 
म्हणून अधिकाऱ्यावर ओरडतो !
अनेकदा अजित पवार अधिकाऱ्यांवर ओरडत असतात याबाबत बोलताना पवार म्हणाले,"जनतेच्या पैशातून होणारी विकासकामे योग्य पद्धतीने व्हायला हवी म्हणून आपण अधिकाऱ्यावर ओरडत असतो. पत्रकार ते दाखवतात पण अधिकाऱ्यावर का ओरडू नये? सातवा वेतन आयोग दिलाय, कामात कुचराई केलेली नाही चालणार ! चांगलं काम केलं तर कौतुक देखील करीत असतो" !


हे देखील वाचा : (बातमीला टच करा )



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा